Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

Mohan Joshi Calls Theatre and Film Industry a Mirage: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी नाटक आणि चित्रपट क्षेत्र ‘मृगजळा’समान असल्याचे सांगत नव्या पिढीला वास्तवाचा इशारा दिला.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: नाटक, चित्रपट ही कलाक्षेत्रे ‘मृगजळा’समान आहेत. त्यामुळे नव्या पिढीने आपली योग्यता पाहूनच या क्षेत्रात उतरायला हवे. या क्षेत्रात स्वत:चे भांडवल असे काहीही नसते. त्यामुळे अनेकांना या क्षेत्राचा मोह पडतो. मात्र, श्रम, कौशल्य हे या क्षेत्रात येणाऱ्यांसाठीचे भांडवल असते, हे समजले पाहिजे. त्याची तयारी नसेल तर निराशेला सामोरे जावे लागते, असे मत ज्येष्ठ अभिनेते, नियोजित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले. सरकारच्या विशेष कोट्यातून पडद्यामागील कलावंतांना घरे मिळावीत, यासाठी यापुढे झटणार आहे, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com