esakal | पुरामुळे हुकली शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा । CET Exam
sakal

बोलून बातमी शोधा

पुरामुळे हुकली शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा

पुरामुळे हुकली शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ओहर येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या केंद्रावर एमएचटी सीईटीचे परीक्षा केंद्र होते. हर्सुलकडून ओहरला जाण्याच्या मार्गावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. यात शंभराहून अधिक विद्यार्थी आहेत. एमएचटी सीईटीची दोन सत्रात परीक्षा सुरु आहे. मंगळवारी सकाळी काही विद्यार्थी केंद्रावर पोचले.

हेही वाचा: देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान

मात्र, दुपारच्या सत्राच्या पेपरसाठी जाणाऱ्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचता आले नाही. मुलीचा पेपर हुकला, त्यामुळे सीईटीची दुसरी संधी मिळावी, अशी मागणी शिवाजी वाघ या पालकाने केली. एमएचटी सीईटी परिक्षेसाठी सात केंद्रावर सकाळच्या सत्रात १,६०१ विद्यार्थ्यांपैकी १,३२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २७६ विद्यार्थी गैरहजर होते. दुपारच्या सत्रात १,६०१ विद्यार्थ्यांपैकी १,२२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३७६ विद्यार्थी गैरहजर होते. त्यात सर्वाधिक १६९ गैरहजर परिक्षार्थी एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे होते, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले.

loading image
go to top