देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान/Deglur By Poll | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर

देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Deglur By Poll) जाहीर झाली असून त्यासाठी येत्या ता. ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ता. दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. काँग्रेसचे (Congress) आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. निवडणुक आयोगाने देशभरातील एकूण ३३ मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ता. ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून ता. दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, देगलूरच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत ता. आठ ऑक्टोबरपर्यंत आहे. ता. ११ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार असून ता. १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ता. ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर ता. दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

२००९ मध्ये देगलूर-बिलोली हा राखीव विधानसभा मतदारसंघ झाला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे अंतापूरकर आमदार झाले. २००९ आणि २०१९ च्या निवडणुकीत अंतापूरकर यांनी साबणे यांचा तर २०१४ च्या निवडणुकीत साबणे यांनी अंतापूरकर यांचा पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांना कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेत मार्चमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना ता. नऊ एप्रिलला त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणुक होत आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीची तयारी कॉँग्रेस, भाजप, वंचित आघाडीसह इतरही पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी यापूर्वीच सुरू केली आहे.

हेही वाचा: प्रभाग रचनेचा बार फुसका, आता लक्ष महा आघाडीवरच!

loading image
go to top