Wedding Expenses : कौतुकास्पद! लग्नात फेटे बांधण्याऐवजी वाटली साडेतीनशेवर पुस्तकं; पाडला नव्या विचारांचा पायंडा

more than 300 book  distributed instead of tying feta at the wedding Avoid unnecessary expenses
more than 300 book distributed instead of tying feta at the wedding Avoid unnecessary expenses

छत्रपती संभाजीनगर : लग्नात होणारी वारेमाप उधळपट्टी टाळण्याकडे आता अनेकांचा कल दिसू लागला आहे. लग्नावर अनावश्यक होणारे खर्च टाळणे महत्त्वाचे आहेच, पण त्यातही लग्नात फेटे बांधल्यानंतर अनेकजण लग्नानंतर फेटे तिथेच ठेवून जातात. परिणामी अनाठायी होणाऱ्या खर्चात आणखीनच वाढ होते.

हीच गरज ओळखून धाराशीव जिल्ह्यातील निवृत्त मुख्याध्यापकाने मुलाच्या लग्नात मात्र फेटे बांधून सत्कार करत होणारा खर्च वाचवत साडेतीनशेवर पुस्तके वाटप करुन सत्कार करुन नव्या विचारांचा जणू पायंडाच पाडला. या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक, प्रेरणादायी, अंधश्रध्दा निर्मूलन तसेच तुकाराम महाराज यांच्यावरील संत साहित्य आदी पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके कुणाच्या जगण्याचा आधार ठरतील, तर कुणाला जगण्याला आधार देतील, असा विश्वास त्या निवृत्त मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.

more than 300 book  distributed instead of tying feta at the wedding Avoid unnecessary expenses
मनसेला खंडणी दिली नाही म्हणून अडकवलं? उरण येथील गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात बिल्डरचे गंभीर आरोप

परांडा (जि.धाराशिव) येथील दिलीप शेरे असे निवृत्त मुख्याध्यापकांचे नाव आहे. शेरे दाम्पत्याच्या मुलाचा नुकताच विवाह पार पडला. नवदांपत्य दोघेही उच्चशिक्षित. त्यांनाही फेटे बांधण्यावर खर्च करण्याऐवजी पुस्तके देऊन सत्कार करण्याचा विचार पटला. लग्न म्हटले की मानापानाच्या गोष्टी ओघाने आल्याच.

दरम्यान वऱ्हाडी मंडळी, नातेवाईकांपैकी कोणी फेटे बांधावयाचे चुकून जरी राहिले तरी अपमानासारख्या गोष्टी घडतात. इतकेच नव्हे तर ५० हजारांहून अधिक खर्च फेट्यांवर होतो, तसेच प्रत्येकाचा सत्कार करण्यात वेळही खूप होते, त्यातच लग्न मुहूर्त टळून गेल्याने अनेकजण नाराजही होतात, या गोष्टीला छेद देत दिलीप शेरे आणि संगिताताई शेरे या दाम्पत्याने सात ते दहा हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली.

फेटे बांधण्यावरुनही ठरतेय प्रस्थ

लग्नात फेटे बांधल्यावर आपण मोठे प्रस्थ आहेत, असा समज आहे. शिवाय लग्नाची शोभा वाढावी या समजातूनही फेटे बांधले जातात. परंतू लग्नाला शोभा वाढविण्याच्या नादात वाढता खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानापानातून उद्भवणारी नाराजी यासारख्या घटनांना वरवधू पित्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय पुस्तके दिल्यास ज्या व्यक्तीला वाचता येत नाही असेही व्यक्ती पुस्तके आवडीने घरी घेऊन जातात. घरातील सदस्यांपैकी कोणी ना कोणी पुस्तके वाचतात. हाही एक प्रकारचा फायदाच असल्याचे मत शेरे दाम्पत्य व्यक्त करतात.

more than 300 book  distributed instead of tying feta at the wedding Avoid unnecessary expenses
Video : मै निकला गड्डी लेके! राहुल गांधींची ट्रक सवारी...; ५० किमी केला ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवास

फेटे बांधणे संस्कृतीचा भाग नाही

कोणताही समारंभ, कार्यक्रम विधी हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, अगदी प्राचीन काळापासून हे प्रकार सुरु आहेत, मात्र संस्कृतीच्या नावाखाली आजकाल जवळपास अनेक कार्यक्रमांमधून चुकीच्या, कालबाह्य परंपरा सुरू होऊ पाहत आहेत. अनेक परंपरांचा अर्थ न लावता त्या पूर्वापार जशाच्या तशा पाळणे सुरू आहे.

या सर्व परंपरांचा श्रीमंत वर्गावर फारसा परिणाम होत नाही. परंतु मध्यमवर्गीय शेतकरी आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या परिवारांवर त्याचा ताण पडतो. त्यामुळे या सर्व प्रकारांचा फेरविचार करून त्यात बदल करणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम किंवा अगदीच नाजूक असणाऱ्या कुटूंबावर लादलेल्या परंपरांचा ताण पडल्याने कर्ज वाढत आहे. रीन (कर्ज) काढून सण साजरा करणारी मंडळी यातून धडा घेतील अशी अपेक्षा शेवटी श्री. शेरे व्यक्त करतात.

लग्नात फेट्यावर केवळ अनावश्यक खर्चच होत नाही तर वेळही खर्च होतो, पुन्हा मानापनाच्या गोष्टी घडतात. त्यामुळे पर्याय म्हणूनच नाही तर पुस्तके वाटप करुन वऱ्हाडी मंडळींचा सत्कार करुन विचारांची बांधिलकी जोपासण्यासाठी हा पायंडा पडणे आवश्यक आहे.

- दिलीप शेरे, निवृत्त मुख्याध्यापक, परंडा.

more than 300 book  distributed instead of tying feta at the wedding Avoid unnecessary expenses
Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

‘व्हाटसअप युर्निव्हर्सिटी’ऐवजी पुस्तकातून ‘ॲक्चुअल नॉलेज’

व्हॉटसअपवर आलेले विविध संदेश खात्रीशिवाय आपण पुढे पाठवत असतो. यातून दोन धर्मात तेढ निर्माण होणारे संदेश असतात. दोन धर्मात निर्माण होणारी तेढ वाचविण्यासाठी पुस्तके उपयोगी ठरतात. त्यातून ‘ॲक्चुअल नॉलेज’ मिळते. त्यामुळे असा पायंडा पडलेला निश्चित चांगला असल्याची भावना समाजातून समोर येताना दिसते आहे.

शेरे कुटुंबातील वर दीपक, वधू वृषाली या नवदाम्पत्याने आलेल्या पाहुण्यांना पुस्तकरूपी भेट देऊन समाजासमोर नवीन आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर नवदाम्पत्यांनीही पुस्तके वाटपाच्या भूमिकेचा एक भाग बनावे, असे आवाहन शेरे दाम्पत्याने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com