Water Problem : मोसंबी रोपवाटीका धारकांना पाणी टंचाईचा मोठा फटका, कोट्यावधीचे नुकसान

तीन वर्षे जोपासलेल्या मोसंबी कलमा उपटुन बांधावर फेकुन द्यावे लागत असल्याचे विदारक चिञ.....गेल्या तीन दशकांपासुन कलमी मोसंबीच्या रोपवाटीकेसाठी जिल्हातच नव्हे तर मराठवाड्यात मोसंबी कलमांचे माहेरघर म्हणुन प्रसिध्द असलेल्या आडुळ ता. पैठण येथील जवळपास दोन शे च्यावर शेतकरी खाजगी व शासकीय रोपवाटीकांच्या माध्यमातुन मोसंबीच्या विविध जातीच्या कलमांची गेल्या तीन दशकांपासुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्री करतात.
Water Problem
Water Problem sakal

आडुळ : गेल्या तीन दशकांपासुन कलमी मोसंबीच्या रोपवाटीकेसाठी जिल्हातच नव्हे तर मराठवाड्यात मोसंबी कलमांचे माहेरघर म्हणुन प्रसिध्द असलेल्या आडुळ ता. पैठण येथील जवळपास दोन शे च्यावर शेतकरी खाजगी व शासकीय रोपवाटीकांच्या माध्यमातुन मोसंबीच्या विविध जातीच्या कलमांची गेल्या तीन दशकांपासुन दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्री करतात. कमी क्षेञात जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याने वर्षा गणिक यात वाढ होत आहे शिवाय येथील अनेक अल्पभुधारक शेतकरी यांनी मोसंबी कलमे तयार करुन विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता.

त्यामुळे या गावात दरवर्षी जवळपास विस ते पंचविस कोटी रुपयांचे उत्पन्न गावाला मिळत होते. माञ गेल्या तीन वर्षांपासुन परिसरात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने शेतकरयांनी नविन फळबागा लागवडीकडे पाठ फिरविली तर ज्यांच्याकडे अगोदरच मोसंबी बाग आहे यातील अनेकांनी पाणी टंचाई मुळे ती तोडली तर ज्यांच्याकडे शेततळे किंवा मुबलक पाणी आहे ते अगोदरचीच बाग वाचविण्यासाठी जीवाची पराकाष्टा करीत आहेत.

पाणी टंचाई मुळे ती तोडली तर ज्यांच्याकडे शेततळे किंवा मुबलक पाणी आहे ते अगोदरचीच बाग वाचविण्यासाठी जीवाची पराकाष्टा करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणुन २०२१ या वर्षी विक्रीसाठी तयार असलेली रोपे आजतागत विक्री झाली नाही. पुढच्या वर्षी तरी विक्री होईल या आशेपोटी गेल्या तीन वर्षांपासुन रोपवाटिका धारक शेतकरी त्याची निगा राखुन त्यावर खर्च करीत आहेत माञ यंदा तर सर्वञ भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने कलमांच्या विक्रीची आशा मावळली त्यामुळे येथील जवळपास दिड शे च्यावर रोपवाटीकाधारक शेतकरी यांनी त्यात रोपवाटीकेत असलेल्या कलमी मोसंबी रोपांना विकतचे ही पाणी आणावे कुठुन असा प्रश्न निर्माण झाल्याने येथील खाजगी व शासकिय अशा जवळपास शंभरच्या वर रोपवाटीकाधारकांनी आपापली रोपे उपटुन बांधावर फेकली आहेत तर अनेक शेतकरी रोपवाटिकेतील रोपे नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत.

एक एकर क्षेञासाठी येवढा खर्च

एक एकर क्षेञातील रोपवाटीकेसाठी जवळपास नऊ ते दहा लाख रुपये वार्षिक खर्च होतो. यात कलम बांधणे, काडी आणने, वेळोवेळी टाचणी, खुरपणी, औषध फवारणी, रासायनिक खते व विक्री याचा समावेश आहे. त्यामुळे ज्या रोपवाटीका धारकाची २०२१ ला कलमे विक्री साठी आली आणि आता पर्यंत त्याची विक्री झाली नाही त्यांचे या तीन वर्षात जवळपास २५ ते ३० लाखाचा एकरी खर्च झाला माञ हाती काहीच आले नसल्याने हे रोपवाटीकाधारक शेतकरी डबघाईला आले आहेत.

माहिती येथील प्रल्हाद पिवळ, संदिप पिवळ, ज्ञानदेव येवले, शेषराव पिवळ सह अनेक शेतकरी यांनी दैनिक सकाळ ला दिली आहे. आडुळ सह परिसरातील अनेक शेतकरी गेल्या तीन दशकांपासुन रोपवाटीकाच्या माध्यमातुन मोसंबीची न्यु शेलार, कॉटन गोल्ड, गावरान, रंगपुरी खुंटा वर्ती न्यु शेलार या रोपांची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती यातुन फक्त आडुळ येथे तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल होत होती माञ गेल्या तिन वर्षात रोपांची विक्री थंडाल्याने हि उलाढाल शुन्यावर आली आहे.

एका एकर क्षेञात कलमांची लागवड केली होती, यासाठी लागवडी पासुन ते विक्री येई पर्यंत एकरी १० लाख रुपये दर वर्षी खर्च झाले माञ आता हे पैसे वसुल होण्याची आशा मावळल्याने रोपे उपटुन फेकली आहे......प्रल्हाद पिवळ (शासकिय रोपवाटीका धारक शेतकरी, आडुळ) रोपवाटीका धारक शेतकरी रोपवाटीकेच्या माध्यमातुन जी कलमे तयार करतात त्याला कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण मिळत नाही त्यामुळे आडुळ परिसरातील शैकडो शेतकरयांना शासकिय अनुदान किंवा मदत मिळणार नाही त्यामुळे शासनाने मोसंबी कलमांना विमा संरक्षण द्यावे.. गणेश कोल्हे (खाजगी रोपवाटिका धारक शेतकरी, आडुळ)

रोपवाटिका शासकिय असो कि खाजगी यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शासना कडुन कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. सध्या कृषि विभाग ज्या फळबागा पाण्याअभावी जळत आहेत त्यांना विचविण्यासाठी शेतकरयांच्या बांधावर जावुन मार्गदर्शन करीत आहेत...... वल्लभ भोसले (मंडळ कृषि अधिकारी,आडुळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com