

MPSC Students Protest in Chhatrapati Sambhajinagar
esakal
Government Against Protest Students : छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी, तसेच कंबाईन परीक्षांमधील (PSI, STI, ASO, SR) जागा वाढवाव्यात, यासह PSI परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवावी, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी केली.