

MSBTE
sakal
छत्रपती संभाजीनगर : तंत्रशिक्षणाच्या पदविका हिवाळी परीक्षेत प्रविष्ट १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या ४ लाख २५ हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन विक्रमी वेळेत पूर्ण झाले. १४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर केवळ अठरा दिवसांत परीक्षकांनी ऑनलाइन मूल्यांकन केले, अशी माहिती ‘एमएसबीटीई’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचे उपसचिव डॉ. देवेंद्र दंडगव्हाळ यांनी ‘सकाळ’ला दिली.