
छत्रपती संभाजीनगर : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ४ लाख २६ हजार ग्राहकांकडे २३८ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे. या विरोधात वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली.