esakal | मराठवाड्यातल्या थकबाकीपुढे महावितरणने टेकले हात !     
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitran.jpg

मराठवाडयात पूर्वीपासून व कोरोना संकटाच्या लॉकडाउननंतर बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात तब्बल सर्व प्रकारच्या ग्राहकांनी तब्बल ३,२२२ कोटी रूपये थकवल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे.

मराठवाड्यातल्या थकबाकीपुढे महावितरणने टेकले हात !     

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद :  मराठवाडयात पूर्वीपासून व कोरोना संकटाच्या लॉकडाउननंतर बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात तब्बल सर्व प्रकारच्या ग्राहकांनी तब्बल ३,२२२ कोटी रूपये थकवल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तर आँगसट पर्यंत केवळ ४७२ कोटी रुपयांची वीज बिले ग्राहकांनी भरणा केलेला आहे. महावितरण ही महानिर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीन्यांकडून वीज विकत घेते. ही वीज महापारेषण कंपनीकडून महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रापर्यंत पोहचविली जाते. 

महावितरणचा डोलारा डळमळीत 
विकत घेतलेली वीज महावितरण कंपनीकडून ही वीज वीज ग्राहकांपर्यंत पोहचविली जाते. वीज खरेदीपोटी व वहन खर्चाचे पैसे दरमहा या कंपन्यांना दयावे लागतात. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे दरमहा महावितरणकडे भरणा न केल्यास वीज खरेदी करणे कठीण होवून जाते. या परिस्थितीने महावितरणचा डोलारा डळमळीत झाला आहे. 

तीन हजार कोटीची थकबाकी 
कोरोना काळासह पूर्वीपासून मराठवाडयातील जनतेचे वीज बिल भरण्याकडे उदासिनता आहे. कोरोनानंतर काही वीज ग्राहकांनी पूर्णपणे वीज बिल भरणा करणे बंद केल्याने मराठवाडयात थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. आँगस्ट अखेर ३,२२२ कोटी रूपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन टक्के दिली सवलत 
मार्च महिन्यात लॉकडावून झाल्यानंतर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. महावितरणने ग्राहकांना दिलासा देत बिलाचे हप्ते पाडून दिले. तसेच लॉकडाउन काळातील वीज बिलांचा एकत्रित भरणा केल्यास अशा ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात आली होती. महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरघ्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष, लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी बिल दुरूस्तीसाठी व्हॉटसअॅप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस, वीज बिल तपासणीसाठी वेब लिंक आणि वीज बिलावर बिलाची संपूर्ण माहिती आदी उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामुळेच थकबाकी भरण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. बी. गित्ते यांनी विनंती केले आहे. 

मराठवाडयात वीज बिलाची थकबाकी 
ग्राहक थकबाकी भरणा केलेली रक्कम (कोटी मध्ये) 

  •                    घरगुती,      व्यापारी 
  • औघोगिक      ११४२.८३     ४४९.८९ 
  • पाणी पुरवठा  ०५०९.८१      ३.२२ 
  • पथदिवे         १५३९.०४     ३.३५ 
  • इतर           ०००३०.४५     १५.८५ 
  • एकुण         ३,२२२.१३       ४७२.३१
loading image