esakal | पोलिस अधीक्षकांसह महापालिका प्रशासक पुन्हा क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

शुक्रवारी (ता. २१) श्रीमती पाटील यांच्या वाहनाचा चालक व बंगल्यावरील चार कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे श्री. पांडेय, श्रीमती पाटील व मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

पोलिस अधीक्षकांसह महापालिका प्रशासक पुन्हा क्वारंटाईन

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व त्यांच्या पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील पुन्हा एकदा क्वारंटाईन झाले आहेत. श्रीमती पाटील यांच्या बंगल्यावरील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यात एका वाहन चालकाचा समावेश आहे. त्यामुळे पाच दिवस विलगीकरणात राहण्याची शक्यता आहे. या दोघांच्या चाचण्यांचे अहवाल शुक्रवारी (ता. २१) निगेटिव्ह आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. दोन महिन्‍यांपूर्वी दोघे क्वारंटाईन झाले होते. 

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तककुमार पांडेय हे पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या बंगल्यात राहतात. याठिकाणी काम करणारा स्वयंपाकी दोन महिन्यांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे श्री. पांडेय, श्रीमती पाटील व मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी (ता. २१) श्रीमती पाटील यांच्या वाहनाचा चालक व बंगल्यावरील चार कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

हेही वाचा- औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात डाॅक्टर-नर्सला मारहाण

त्यामुळे श्री. पांडेय, श्रीमती पाटील व मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. असे असले तरी तिघांची आणखी तीन दिवसानंतर चाचणी केली जाणार आहे. तोपर्यंत ते क्वारंटाईन राहण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. 
 
कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही पॉझिटिव्ह 
बंगल्यावरील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. अनेकांची नातेवाईक देखील पॉझिटिव्ह आल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

दिवसभरात ११२ जण पॉझिटिव्ह 
शहरात शुक्रवारी (ता. २१) २०११ अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यातून १२२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सहा एण्ट्री पॉइंटवर ७१८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४५ जण पॉझिटिव्ह निघाले. तेरा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये ८७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात १२९३ जणांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७७ जण पॉझिटिव्ह निघाले. दिवसभरात दोन हजार ११ अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२२ जण पॉझिटिव्ह निघाले. ३६१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

loading image
go to top