

Marathi Language Advocacy Gains Momentum; Vishwas Patil Urges Doctors to Lead
Sakal
छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय साहित्य-संस्कृती संमेलनासारखा उपक्रम हाती घेऊन डॉक्टरांनी मराठी शब्दांची मृदुता आणि संस्कारक्षमतेचा गौरव केला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी डॉक्टरांच्या अशा संमेलनांची आवश्यकता आहे. बालक आईच्या शब्दांवर वाढते. राज्यातील ९८ टक्के यशस्वी झालेले लोक मराठीतून, जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांत शिकले आहेत. त्यामुळे ‘इंटरनॅशनल’ शाळेत शिकल्याशिवायही मोठे होता येते. डॉक्टरांनी मराठीचा वसा जाणीवपूर्वक घ्यावा. आपण मुलांना इंग्रजी शाळांत टाकून चुका केल्या असतील; पण आपल्या नातवंडांना तरी ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा द्यावा’’, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केले.