Parbhani News : बोरी परिसरात खासगी कंपन्यांचे नेटवर्क गुल

रेंज नसल्याने मोबाईलचे केलेले रिचार्ज वाया
parbhani
parbhanisakal

बोरी : बोरी व परिसरात खाजगी मोबाईल कंपनीचे नेटवर्क (रेंज) नेहमीच गुल होत असल्याने मोबाईल ग्राहकांना अनेक अडचणी सामना करावा लागत आहे. दरम्यान, नेटवर्क बंद होत असल्याने मोबाईल ग्राहकांचे रिचार्ज वाया जात असल्याने आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे.

पुर्वी मोबाईल फक्त संभाषण करण्यासाठी ग्राहक वापर करत होते. परंतू आता विविध कामांसाठी मोबाईलचा वापर केला जात आहे. मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. खाजगी मोबाईल कंपन्या विविध प्रकारची आमिष दाखवून मोबाईल ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. वेगवेगळ्या योजनांअंतर्गत ग्राहकांना हे फ्री मिळणार असे संदेश देत आहे. मोबाईल ग्राहकांना आपल्याकडे वर्ग करण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू आहे. परंतू खाजगी मोबाईल कंपन्यांकडून सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने दिसून येत आहे.

parbhani
Parbhani News : अबब... चक्क हरवलेले मोबाईल सापडले

नेटवर्क (रेंज) कधीही जात असल्याने मोबाईल ग्राहकांचे संभाषण मध्येच बंद होत असल्याने गैरसमज होत आहे. तसेच मोबाईलचा वापर आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असून नेटवर्क बंद होत असल्याने व्यवहार खोळंबली आहे. पाल्यांना नेटवर्क मिळत नसल्याने अभ्यास करताना अडचणी सामना करावा लागत आहे.संबंधित खाजगी मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शासनाच्या विविध योजनांचे अर्ज करण्यासाठी मोबाईल वर ओटीपी येतो तसेच दुष्काळाचा विमा मिळण्यासाठी व खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी मोबाईल वर ओटीपी येतो परंतु मोबाईल नेटवर्क कधीही बंद होत असल्याने अनेक अडचणी सामना करावा लागत आहे.

— विष्णू कुटे, मोबाईल ग्राहक, धानोरा.

parbhani
Parbhani News : अतिवृष्टीने सव्वा लाख हेक्टरचे नुकसान

माझा वडापाव विक्रीचा व्यवसाय असून दररोज पाचशे ते हजार रुपये आँनलाईन येतात. परंतू नेटवर्क नसल्याने विनाकारण उधारी वाढत आहे. ग्राहक नेटवर्क बंद असल्याचे कारण सांगत आहेत.

— मुक्तेश्वर सरकटे, व्यापारी, बोरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com