
जगासह देशात कोरोनाचे गंभीर संकट असताना या स्थितीत हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतून एक पस्तीसवर्षीय गर्भवती महिला कुटुंबासह शहरात आली; पण या महिलेसह त्यांच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या हाती चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल पडताच दुसरीकडे तिला कळा सुरू झाल्या. ‘हायरिस्क’ची रुग्ण असल्याने व ‘कोविड’ची लागण झाल्याने संपर्कात न येता प्रसूती करणे आव्हानच होते. तरीही अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनंतर तिची सुखरूप प्रसूती केली. वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात नाव कोरले जावे, अशी कामगिरी डॉक्टरांनी केली. जिल्हा रुग्णालयात ही प्रसूती यशस्वी करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता जाधव यांची मुलाखत.
उत्तर - प्रसूतीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने धोकादायक आहे, असे म्हणता येईल; पण रुग्ण सिम्थेमॅटिक नव्हती. कोरोना जरी पॉझिटिव्ह असेल तरी लक्षणे नव्हती. कोरोनाचे विषाणू व्हजायनल सिक्रीशन, अथवा अॅमिनोलॅटिक फ्ल्युड यात आढळतात असे आयसीएमआर गाइडलाइननुसार असे सांगितलेले नाही, कुठेही हे निरीक्षण नाही. असे कुठेच सिद्ध झाले नाही, रिसर्च डाटाही नाही किंवा अशी बाब समोर आलेली नाही. त्यामुळे गर्भवती माता व त्यांना होणाऱ्या मुलांना कोरोना होतो, याबाबत आतापर्यंत संशोधन झालेले नाही. तथापि, हा खूप मोठी रिस्क टास्क होता.
उत्तर - आपण ओपन प्रोसिजर करतो. पेशंटचे ड्रॉपलेट्स तिच्या शरीरावर पडू शकतात. विशेषतः विविध प्रकारचे स्राव ते कुठेही पडू शकतात. प्रसूतीसाठी डॉक्टरांना या पेशंटला अगदी जवळून हाताळावेच लागते. त्यामुळे कॉन्टॅक्ट रिस्क जास्त असते. या रुग्णाचीही जास्त रिस्क होती.
उत्तर - पेशंटला पूर्ण पीपीई किट होती. पेशंटला फेस मास्क, एन-९५ मास्क, शूज घालण्यात आला होता. आम्हीही पीपीई किट, दर्जेदार इक्युपमेंट मास्कसह सुरक्षित आवरणात होतो. इतर बाबींची आम्ही पूर्णपणे काळजी घेतली. त्यानंतर सिझेरियन प्रसूती केली.
उत्तर - आपण बाळाचा; तसेच आईच्या योनीमार्गातील स्वॅब घेतला आहे. गर्भजल नमुनेही घेतले आहेत. आईपासून बाळाला कोरोना होऊ शकतो, असे संशोधन आतापर्यंत कुठेही झालेले नाही, अथवा तशा गाइडलाइन्स आलेल्या नाहीत. अॅफ्ल्युडचे स्वॅब घेतले आहेत. तरीही चाचणी करून बघूया.
हे वाचले का ? कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?
उत्तर - सामान्य प्रसूती व्हावी, यासाठीच आम्ही प्रयत्नात होतो. रुग्णाच्या प्रसूतीसाठी योनीमार्गातून औषधीही सोडली होती. बारा वर्षांनंतर ती प्रसूत होणार होती. त्यामुळे थोडी अडचण होती, पिशवीचे तोंड उघडत नव्हते. तर दुसरीकडे प्रसूतीची वेळ होऊनही प्रसूतीला विलंब झाला होता. त्यातच बाळाचे ठोके कमी-जास्त होऊ लागले. प्रसूती होणे आवश्यक होते. म्हणून आम्ही तिचे समुपदेशन केले व सिझेरियन करायचे ठरविले. इतक्या वर्षांनंतर बाळ होणार होते, ते सुखरूप असावे, यासाठी आमची धडपड व आईलाही हेच वाटत असते. कळा सुरू होऊनही प्रसूती होत नव्हती. बाळाचा डोक्याजवळ हात होता, ही गुंतागुंतच होती. रुग्ण हायरिस्क होती; पण आमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. पी. एम. कुलकर्णी यांनी गर्भवती रुग्णाला भूल (अॅनेस्थेशिया) न डगमगता एका ट्रिकमध्ये दिला. डॉ. कमलाकर मुखेडकर यांचेही सहकार्य लाभले. परिचरापासून सर्व स्टाफने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. याचे आम्ही प्रेझेंटेशन तयार करणार आहोत.
उत्तर - मला तीन वर्षांची मुलगी आहे. सासू-सासरे सोबत घरी असतात. त्यांना विविध व्याधी आहेत. त्यामुळे मनात काळजी होती; पण माझे पती फिजिशियन डॉ. विलास राठोड यांचे खूप पाठबळ होते. आपण डॉक्टर आहोत आणि असे आव्हान स्वीकारायला आपण नेहमी तयार राहावे, हे त्यांचे मला उभारी देणारे शब्द होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.