New Uniform Maharashtra: सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा गणवेश ; योजनेत बदल

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. पुढील वर्षीपासून या योजनेत बदल करण्यात आला आहे.
New Uniform Maharashtra
New Uniform Maharashtraesakal

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. पुढील वर्षीपासून या योजनेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सातवीच्या मुलांना हाफ पँट आणि शर्ट असा गणवेश असणार आहे.

New Uniform Maharashtra
Sambhaji Nagar News : आंटीसह बंगाली डॉक्टर जेरबंद ; हर्सूल पोलिसांची बुधवारपेठ, सासवडमध्ये कारवाई ,महिला पसार

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक, इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट आणि इयत्ता आठवीमधील मुलींकरीता सलवार-कमीज व ओढणी अशी गणवेशाची रचना करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांकरीता हाफ पॅंट व हाफ शर्ट आणि इयत्ता आठवीमधील मुलांकरीता फुल पँट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेषाची रचना करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com