esakal | औरंगाबादेत आणखी नऊ शहर बस सोमवार पासून रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

city bus

औरंगाबादेत आणखी नऊ शहर बस सोमवार पासून रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी झाल्याने स्मार्ट शहर बस विभागातर्फे हळूहळू शहर बससेवा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारपासून (ता. १२) आणखी नऊ बस रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे एकूण बसची संख्या ४१ एवढी होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात शहर बससेवा बंद होती. गेल्या महिन्यांपापासून टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू केली जात आहे. अद्याप संपूर्ण १०० बस सुरू झालेल्या नाहीत. आता तिसऱ्या टप्प्यात वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार व प्रवाशांच्या मागणीनुसार मार्ग क्रमांक २५ सिडको ते रांजणगाव मार्गे हर्सूल टी पॉइंट, दिल्ली गेट, मध्यवर्ती बस स्थानक अशी बससेवा सुरू केली जात आहे.

सकाळी सव्वा सहाला सर्वात पहिली फेरी असणार आहे. रात्री नऊ वाजून २० मिनीटांनी शेवटची फेरी होईल. तसेच मार्ग क्रमांक २२ सिडको ते रांजणगाव, मार्गे-बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक आणि मार्ग क्रमांक १५ सिडको ते रांजणगाव, मार्गे-जयस्वाल हॉल, टीव्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कूल, हिमायत बाग, दिल्ली गेट, मध्यवर्ती बस स्थानक असा असेल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होईल.

हेही वाचा: रिकाम्या हातांना लिंबोळ्याचा आधार; पाचोडच्या लिंबोळीला परराज्यातून मागणी

नियम पाळणे बंधनकारक
शहर बस निर्जंतूक केल्या जात आहेत. असे असले तरी नागरिकांना प्रवासाच्यावेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असेल. अधिक माहितीसाठी ७५०७९५३८२८ नंबरवर व्हॅटस्ॲप साहाय्याने संपर्क करा असे आवाहन स्मार्ट सिटी शहर बस विभागातर्फे करण्यात आले आहे.

loading image