esakal | CoronaVirus : 'कोरोना'मुळे वीजबिल भरणा केवळ ऑनलाईन
sakal

बोलून बातमी शोधा

photo

- बील केंद्रांना तुर्तास कुलूप 

- मार्चमध्ये पावणेदोन लाख ग्राहकांनी

भरले ऑनलाईन वीजबिल 

CoronaVirus : 'कोरोना'मुळे वीजबिल भरणा केवळ ऑनलाईन

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : 'कोरोना'च्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे बँकांमध्ये रोकड व धनादेश स्वीकारण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने महावितरणने खासगी वा कार्यालयीन वीजबिल भरणा केंद्रे तात्पुरती बंद केली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिले केवळ ऑनलाईन भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

औरंगाबाद परिमंडलातील वीजग्राहकांनी मार्च महिन्यात आतापर्यंत १ लाख ८२ हजार ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरले आहे. उर्वरित वीज ग्राहकांनीही त्यांचे चालू वीजबिल तसेच थकबाकीचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संकेतस्थळाचा करा वापर

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा उपयोग करून वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करता येतो. हेच पर्याय वापरून महावितरणच्या मोबाईल अँपवरून बिल भरण्याची सुविधा आहे. भीम अँप किंवा इतर कोणत्याही पेमेंट वॅलेटच्या माध्यमातून वीजबिलाचा भरणा करणे सुलभ व सुरक्षित आहे. 

पावणेदोन लाख ग्राहकांनी निवडला पर्याय

ऑनलाईन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वेळ व पैशांच्या बचतीची सुविधा महावितरणने दिली आहे. १ मार्चपासून आतापर्यंत औरंगाबाद परिमंडलातील १ लाख ८२ हजार ३४८ ग्राहकांनी त्यांच्या ३३ कोटी ६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही त्यांचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडावा, असे आवाहन मुख्य अभियंता गणेशकर यांनी केले आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८३ हजार ७८२ ग्राहकांनी १७ कोटी ४१ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील ६९ हजार ७४७ ग्राहकांनी १० कोटी ५६ लाख तर जालना मंडलातील २८ हजार ८१९ ग्राहकांनी ५ कोटी ९ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ई-मेलद्वारे वीजबिल 

महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

बिलात ०.२५ टक्के सूट 

ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

तात्काळ मिळते पोच

वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर 'पेमेंट हिस्ट्री' तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
   

loading image