

Leopard Spotted in Nillod-Kaigaon Farmland Area
Sakal
महेश रोडे
सिल्लोड : निल्लोड-कायगाव शिवारातील गट क्रमांक ३०३ मध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची धक्कादायक घटना समोर आली. कचरू सुरासे, कृष्णा आहेर, राहुल आहेर व ज्ञानेश्वर आहेर हे नियमितप्रमाणे शेतकाम करीत असताना अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी तत्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली. अचानक आलेल्या या प्रसंगाने परिसरातील शेतकरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी साईनाथ पवार, मंडळ अधिकारी चांदे व पांडुरंग खटाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.