औरंगाबादेत थरार ! जुन्या वादातून तरुणाचा नऊ जणांनी केला खून

जुना वाद तरुणाला महागात पडला. मध्यरात्री गाठून नऊ जणांनी केला खून...
Murder
MurderSakal
Updated on

औरंगाबाद : जुन्या वादातून एका तरुणाचा नऊ जणांनी खून केल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे. या प्रकरणी त्या नऊ जणांविरोधात सिडको पोलिस (Cidco Police) ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मिसरवाडीत शनिवारी मध्यरात्री घडली आहे. हसन साजीद पटेल (वय २५, रा.मिसरवाडी ) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मृताचा भाऊ जावेद पटेल यांच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा (Aurangabad Crime Update) दाखल करण्यात आला आहे. तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासिर अब्दुल पटेल, राहील अन्सारी, मुसा शेख, रियाज ऊर्फ डाॅन, आखेफ ऊर्फ गोल्डन युनूस कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.(Nine Men Killed Youth In Aurangabad At Midnight)

Murder
गप्प बसणारे भाजप नेते चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात - रोहित पवार

हसन पटेल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करित होता. तो शनिवारी (ता.१५) रात्री नऊ वाजता घराबाहेर पडला. अकरा वाजता त्याच्यावर मिसरवाडी (Aurangabad) नऊ जणांनी हल्ला केला. तालेब चाऊस याने हसनच्या पोटात चाकू भोसकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस अधिकारी विनोद सलगरकर हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com