esakal | हाताला कामच नाही, मास्क अन् सॅनिटायझर आणू कुठून...

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

कोरोनामुळे काम तर नाहीच, असे असूनही उघड्यावर पडलेल्या मजूरांना सुरक्षेची खबरदारी म्हणून किमान सॅनीटायझर, मास्कही मिळालेले नाहीत.

हाताला कामच नाही, मास्क अन् सॅनिटायझर आणू कुठून...
sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कामाच्या मागणीसाठी चौकात गर्दी. त्यात मजूर, मुले, शहरात कामानिमीत्त आलेले तरुण असतात. मग कोणी हॉटेलमध्ये कामाला आलेले तर कोणी छोटमोठ्या दुकानांवर. कोरोनाच्या धास्तीने शहरातील मोठमोठ्या हॉटेलांमध्ये वेटर कमी केले गेले, तर काही हॉटेलांमध्ये पूर्णच स्टाफ कमी करण्यात आला.

याशिवाय मोंढ्यातील दुकांनात काम करणाऱ्या सात-आठ मजुरांपैकी केवळ एक-दोनच मजूर काम करतात. यामुळे तरुण, मजूरांवर उपासमारीचे दिवस आल्याची भावना कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा-  लातूर शहरासह जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

काम तर नाहीच, पण सुरक्षाही नाही

कोरोनामूळे काम तर नाहीच, असे असूनही उघड्यावर पडलेल्या मजूरांना सुरक्षेची खबरदारी म्हणून किमान सॅनीटायझर, मास्कही मिळालेले नाहीत. कोरोनाच्या भितीने पुण्यातील मेस बंदच्या अनुषंगाने औरंगाबादेतही कोरोनामुळे बहूतांश मेस बंद करण्यात आल्या आहेत, तर काही मेस ठराविक वेळेतच सुरु आहेत.

मेसमध्ये काम करणारी मुले बहूतांशी बाहेरगावची आहेत. अशा कोणालाच मास्क, सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात मात्र शेतात उन्हाळातील उरले सुरले काम मजूरांना मिळत आहे तर यातल्याच शहरात आलेल्या मजूरांना मात्र पून्हा गावचा रस्ता धरावा लागला आहे.

क्लिक करा- वैजापुरातून कोरोना संशयित गायब

हातावरचे पोट भागणार कसे?

एका मॉलमध्ये काम करणारा राहूल सांगत होता, सहा महिन्यापासून काम करत होतो, आता कुठं शहरात खाण्याराहण्यापुरते पैसे मिळत होते, पदवीच्या शिक्षणाला हातभार लागत होता, पण आता ठराविकच लोकं कामासाठी ठेऊन घेतली आहेत. मला काम नाही म्हणून सांगितले, पुन्हा कधी घेणार हे सांगितले नाही.

याशिवाय शहरातील गाडे चौक व सिडकोतील कामगार चौकांत दररोज कामासाठी मजुरांची गर्दी असते, मंगळवारी (ता.१८) आधीच काम नव्हते, त्यात कोरोनाचीही भिती असल्याने हातावरचे पोट उपाशी राहणार असल्याचे मजूर आबासाहेब गावडे यांनी सांगितले.

सद्य स्थितीत श्रीमंतालाही मास्क अन सॅनिटायझर वेळेत मिळत नाही, आमच्या हाताला कामच नाही तर आम्ही हे असंल खरेदी कुठून करायचं ?
- सीताराम गदगे, मजूर, जयभवानीनगर