Private Hospital Incident: छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयातील २५ वर्षीय नर्सने बाथरूममध्ये इंजेक्शन घेऊन जीवन संपवले. या प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरू आहे, नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या बाथरूममध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता. २१) सायंकाळी समोर आला.