
Sakal
सध्या दिवसा उकाडा आणि रात्री गारवा जाणवत असून, यंदा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अतिथंडीचा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, या काळात तापमान १० अंशांवर येऊ शकते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिवसा ऊन आणि रात्री गारवा अशी परिस्थिती राहील.
सध्या दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री गारवा जाणवत आहे. ही हिवाळ्याची चाहूल असून, यंदा नोव्हेंबर आणि जानेवारी हे दोन महिने अतिथंडीचे राहू शकतात, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. सध्या दुपारी उकाडा जाणवेल, कमाल आणि किमान तापमानातील अंतर वाढेल. किमान तापमान ३० अंशांवर गेले तर कमाल १९ ते २० अंशांवर येईल, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.