Chh. Sambhaji Nagar : महापालिकेचा अनागोंदी कारभार; मुलांसह ७५ वर्षांच्या महिलेचे महापालिकेसमोर उपोषण

महापालिकेने २००८ मध्ये रेल्वेस्टेशनसमोर १२ दुकानांचे कॉम्प्लेक्स पाडून जागा संपादित केली होती. ही जागा सिंग कुटुंबाची असल्याने जमिनीचा मावेजा मिळावा, अशी मागणी करण्यात आली
Chh. Sambhaji Nagar
Chh. Sambhaji Nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : २००८ मध्ये रेल्वे स्टेशनसमोरील इमारत पाडून महापालिकेने जागा ताब्यात घेतली; पण अद्याप भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत.

महापालिकेत खेट्या मारून उपयोग होत नसल्याने ७५ वर्षांच्या कुलदीप कौर यांनी मुलगा सुरजित व मुलगी गुरमित कौर यांच्यासह महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले.

महापालिकेने २००८ मध्ये रेल्वेस्टेशनसमोर १२ दुकानांचे कॉम्प्लेक्स पाडून जागा संपादित केली होती. ही जागा सिंग कुटुंबाची असल्याने जमिनीचा मावेजा मिळावा, अशी मागणी करण्यात आली; पण महापालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात व्याजासह पैसे द्यावेत, असे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

या आदेशानंतरही महापालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे या कुटुंबाने उपोषण सुरू केले आहे. प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांनी माझ्या घरी येऊन तुम्ही उपोषणाला बसू नका, असे सांगत धमकी दिल्याचा आरोप कौर यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे कैद झाल्याचे त्यांनी सांगितले.

Chh. Sambhaji Nagar
Chh. Sambhaji Nagar Crime : मुलगी नको, मला मुलगाच पाहिजे, झोपेतच आवळला गळा...

चार कोटी अपेक्षित, मिळाले ३२ लाख

न्यायालयाने २०१९ मध्ये महापालिकेने नियमानुसार पैसे द्यावे, असे आदेश दिले; पण महापालिकेने पैसे दिले नाहीत. त्यामुळे पुन्हा २०२३ मध्ये न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यात चार महिन्यांत कारवाई करा असे आदेश मिळाले. त्याला आता सहा महिने झाले; पण कारवाई झाली नाही. नियमानुसार कुटुंबाला एक कोटी ८८ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे.

मोबदला मिळण्यास उशीर झाला तर दरवर्षी १२ टक्के व्याजदर लागू होतो. त्यानुसार ही रक्कम आता चार कोटींच्या आसपास गेली असल्याचे गुरमित कौर यांनी सांगितले; पण आतापर्यंत वडिलांच्या आजारपण व इतर कारणांसाठी ३२ लाखांच्या आसपास रक्कम मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com