उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत दीड हजार जणांचे रक्तदान 

Blood_Donation
Blood_Donation

औरंगाबाद : शिवसेना शाखेच्यावतीने १ जुन ते ५ जुन या काळात आयोजित केलेल्या २७ रक्तदान शिबीरातुन तब्बल १ हजार ७३७ रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे यांनी पुढाकार घेवुन या शिबीराचे संयोजन केले. शिवसेनेच्या सर्व उपशहरप्रमुखांनी आपआपल्या विभागात या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. १७३७ पैकी मंगळवारी (ता.पाच) दिवशी ३६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबीरात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी ही भेटी दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, ज्ञानेश्वर डांगे, रमेश दहीहंडे, हिरा सलामपुरे, किशोर कच्छवाह, नगरसेविका स्मिता घोगरे, नगरसेवक कमलाकर जगताप, सचिन खैरे, दामुअण्णा शिंदे, किशोर कच्छवाह, अनिल जैस्वाल, शेख हनिफ, संजय गारोल, प्रशांत तारगे, करणसिंग काकास, समाजसेवक नितीन घोगरे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटक प्राजक्ता राजपूत, दुर्गा भाटी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व, निबंध स्पर्धा 
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा होईल. रविवार (ता.सात) रात्री सातपर्यंत निबंध पीडीएफ स्वरूपात मागवण्यात आले आहेत; तसेच वक्तृत्व स्पर्धा होतील. संयोजक जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. 

१५ ते २५ वर्षे वयोगटात अ वर्गाची तर ब या खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या वयोगटासाठी केंद्र सरकारचे २० लाख कोटी पॅकेज - खरी वास्तविकता काय?, मी शेतकरी बोलतोय आणि स्थलांतरित कामगार समस्या की समाधान? हे तीन विषय आहेत. तर खुल्या गटासाठी आपली आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्र आजचा अन् उद्याचा आणि कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांचे मनोगत विषय आहेत. विजेत्यांना तीन हजार रुपये, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहेत. 

वक्तृत्वाचा सहा मिनिटांचा व्हिडिओ 
वक्तृत्व स्पर्धा वय १५ ते ३० वर्षे वयोगटासाठी आहे. कोरोना योद्धा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोरोनानंतरचे जीवन आणि शेती हाच प्रगतीचा आधार हे विषय आहेत. स्पर्धकांनी एका विषयावर सहा मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हिडिओ आणि निबंध स्पर्धेतील स्पर्धकांनी पीडीएफ स्वरूपात निबंध नाव, पत्त्यासह प्र.संतोष बोर्डे यांच्या ९२२५७३२२४८ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावा. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख ११ हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com