Chh. Sambhajinagar Crime : मोबाइल चोराला एक वर्षाची शिक्षा, तपोवन एक्स्प्रेसमधील घटनेत प्रवाशाच्या हातावर मारला होता वार
Chh. Sambhajinagar Crime : तपोवन एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाच्या हातावर वार करून मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीस एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने दोषारोपपत्रावर सुनावली कारवाई.
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या डब्यात दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाच्या हातावर मारून मोबाइल चोरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर दोषारोपपत्र सादर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्षम कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.