शेतकऱ्याच्या घामाची थट्टा! २-३ लाख खर्चून पिकलेला १२ क्विंटल कांदा नेला बाजार समितीत, विक्रीनंतर खिशातला रुपया देण्याची वेळ

Onion Farmer Left in Loss Even After Selling 12 Quintals १२ क्विंटल कांदा विकूनही हातात ‘उणा रुपया’ राहिल्यानंतर हतबल झालेल्या शेतकऱ्याने उरलेला तब्बल ३०० क्विंटल कांदा असलेल्या दोन एकर शेतात नागरंटी करून खत म्हणून टाकून दिला.
Market Prices Shock Maharashtra Onion farmer

Market Prices Shock Maharashtra Onion farmer

Esakal

Updated on

गजानन आवारे, पैठण ः ‘शेतकऱ्याने रात्रंदिवस राबायचं, रक्ताचं पाणी करून पिकावर खर्च करायचा आणि शेवटी बाजारात विकताना स्वतःच्याच खिशातून पैसे का भरायचे, आमच्या कष्टाला काही किंमत नाही का, असा संतप्त सवाल पैठण तालुक्यातील वरूडी येथील शेतकरी प्रकाश काकासाहेब गलधर यांनी अख्ख्या यंत्रणेला विचारला. चार एकर शेतात घेतलेल्या उन्हाळी कांद्याला बाजारात इतका कमी भाव मिळाला, की १२ क्विंटल कांदा विकूनही त्यांच्या हातात ‘उणा रुपया’ राहिला. या प्रकारामुळे हतबल झालेल्या गलधर यांनी उरलेला तब्बल ३०० क्विंटल कांदा असलेल्या दोन एकर शेतात नागरंटी करून खत म्हणून टाकून दिला!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com