विमानाचे ढोलताशाने स्वागत 

photo
photo
Updated on

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी (ता.पाच) एकाच दिवशी इंडिगो एअरलाईन्सने मुंबईसह दिल्ली आणि हैदराबाद अशा तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू केली. पहिल्याच दिवशी या सेवांना भरभरून प्रतिसाद मिळाला. तीन शहरांच्या सेवेपाठोपाठ इंडिगोकडून आता नागपूर-औरंगाबाद-पुणे या विमानसेवेचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इंडिगो विमानसेवेच्या उद्‌घाटनानिमित्त चिकलठाणा विमानतळावर बुधवारी सकाळी ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुंबईहून 130 प्रवाशांना घेऊन विमान सकाळी 7.30 वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. विमानतळ प्राधिकरणाकडून या पहिल्या विमानाला वॉटर सॅल्युट करत स्वागत करण्यात आले. उद्‌घाटनप्रसंगी उद्योजक सुनीत कोठारी, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह, सीएमआयएचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया, कमलेश धूत, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, इंडिगोचे स्टेशन मॅनेजर अनिरुद्ध पाटील, महेश्वर वाघ, हिमांशू चव्हाण, शंशाक सिंह, संदीप प्रसाद, प्रशांत गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विमानसेवेच्या उद्‌घाटन प्रसंगी डी. जी. साळवे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय विमानसेवा, बुद्धिस्ट सर्किटसाठी प्रयत्न केला जात आहे. औरंगाबाद-मुंबई या विमानाचे पहिले प्रवासी स्वप्नील लोखंडे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला. उद्‌घाटनानंतर मुंबई परतीच्या प्रवासासाठी 178 प्रवाशांना घेऊन विमान 8.20 वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले. 

मुंबईसह दिल्ली विमानसेवेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्लीहून 170 प्रवासी औरंगाबादला आले तर परतीला 180 औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले. त्याचप्रमाणे हैदराबाद-औरंगाबाद विमानाने 80 प्रवाशांनी तर औरंगाबाद-हैदराबादसाठी 150 प्रवाशांनी प्रवास करून पहिल्याच दिवशी विमानसेवेला भरभरून प्रतिसाद दिला. 

कीर्तीचे स्वागत 

इंडिगोचे मुंबईहून आलेल्या पहिल्या विमानाचे सारथ्य औरंगाबादच्या कीर्ती राऊत हिने केले. तिच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com