esakal | ऑपरेशन थिएटर बंद; महिला रुग्णांचे हाल
sakal

बोलून बातमी शोधा

ulhasnagar

ऑपरेशन थिएटर बंद; महिला रुग्णांचे हाल

sakal_logo
By
बाळासाहेब लोणे

गंगापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर (ओटी) बंद असल्याने शेकडो सिझेरियन प्रसूती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्याने महिला रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील ओटी निर्जंतुकरणाचा अहवाल निगेटिव्ह असल्याने पंचाईत झाली असून आता हा दुसरा अहवाल येण्यास किती दिवस वाट बघावी लागणार असा संतप्त सवाल महिला रुग्णांची उपस्थित केला आहे. (Aurangabad News)

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील उपजिल्हा रुग्णालयातर्फे ऑपरेशन थिएटर (ओटी) निर्जंतुकीरण करून एका कापसाच्या बोळ्यात सदर ओटी निर्जंतुकीरण झाली किंवा नाही. यासाठी निजाम बंगला (औरंगाबाद) येथील सेंट्रल लॅबला अहवाल पाठविण्यात आला होता. मात्र, हा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने येथील ओटी अहवाल जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही. पर्यंत नवीन ऑपरेशन बंद करण्याचे निर्देश होते. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी पुन्हा नव्याने सेंट्रल लॅबला अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र, तो अहवाल अद्यापही उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त न झाल्याने अनेक गोरगरीब कुटुंबांना प्रसूती (सिझेरियन) खासगी रुग्णालयात करावी लागत आहे. याचा नाहक आर्थिक भुर्दंड बसत असून, खासगी रुग्णालय प्रशासनाची चांदी होत आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षण; शिवसंग्रामने केले धरणे आंदोलन

अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ओटी सुरू होते

कोरोनाने बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन थिएटर बंद असल्याने ओटी निर्जंतुकीकरण करण्यात आले. पूर्णपणे निर्जंतुकीकरण झाले की नाही हे तपासण्यासाठी कापसाचा बोळा भिंतीवर फिरवला जातो व हा बोळा सेंट्रल लॅबला पाठवण्यात येतो. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला की ओटी सुरू करण्यात येते. मात्र, येथील उपजिल्हा रुग्णालयातील अहवाल pozitive आल्याने पुन्हा निर्जंतुकीकरण करून सेंट्रल लॅबला पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. याला आणखी किती दिवस लागतील, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नसतात

येथील उपजिल्हा रुग्णालयात कधी भुलतज्ञ तर कधी स्त्रीरोग तज्ञ नसतात. प्रसूती नॉर्मल असल्यास ही बाब धकून जाते. मात्र, कधीकधी नॉर्मल महिलेची प्रसूती अचानक सीझर करावी लागली तर वेळेवर भुलतज्ञ देखील उपलब्ध असायला हवा. त्यामुळे येथे भुलतज्ञासह एका तज्ञ डॉक्टर्सची कायमस्वरूपी मुक्कामी नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रश्न उपस्थित

अनेक महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र, ती देखील रखडली आहे. शेकडो नागरिकांना शासकीय रुग्णालयाचा आधार असतो. मात्र, शासकीय दवाखान्यात सेवा मिळत नसल्यावर अशा रुग्णांनी कोणाकडे जायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: पुर्णा नदीवरील पुल गेला वाहुन;पाहा व्हिडिओ

सेंट्रल लॅबने तत्काळ अहवाल देणे गरजेचे आहे. तसेच पर्यायी ओटी निर्माण करण्याविषयी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. अनेक गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. याची दखल घेण्यात येईल.

- अतुल रासकर, सदस्य, रुग्ण कल्याण समिती

सेंट्रल लॅबकडे अहवाल मागविला आहे. मात्र, तो पोस्टाने येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही रुग्णालयातर्फे कर्मचारी पाठवून हातोहात अहवाल मागवून घेऊन लवकरात लवकर ओटी सुरू करणार आहोत. अनेक रुग्ण सध्या प्रतीक्षेत आहेत.

- डॉ. गीतेश छावडा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर

loading image
go to top