esakal | कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना मिळणार बळ
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना मिळणार बळ

कोरोनामुळे देशात, राज्यभरात अनेक मुले-मुली अनाथ झाली. यामध्ये अनेक जण गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या शिक्षण, राहणे, जेवणाची मोठी समस्या आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना मिळणार बळ

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : कोरोनाच्या Corona संकटात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. काहींचे आई-वडिलांचे छत्रच हरपले. अशा अनाथ झालेल्या राज्यभरातील मुला-मुलींना श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूल Hedgewar Memorial Public School मोफत प्रवेश देणार असून या मुला-मुलींचे राहणे, जेवणासह सर्व प्रकारचा शैक्षणिक खर्च संस्थेकडून केला जाणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ज्या मुलांचे आई किंवा वडील यापैकी एकाचे जरी कोरोनामुळे निधन झाले असेल अशा पाल्यांनाही येथे प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनामुळे देशात, राज्यभरात अनेक मुले-मुली अनाथ झाली. यामध्ये अनेक जण गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या शिक्षण, राहणे, जेवणाची मोठी समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन या स्कूलने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये देश आणि राज्यभरातील मुले-मुलींसाठी प्रवेश घेऊ शकतात. Orphaned Children Will Get Support From Hedgewar Memorial

हेही वाचा: औरंगाबादेतील पर्यटनस्थळे उद्यापासून होणार सुरु,'हे'आहेत नवीन नियम

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना आधार

दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर, मुलीच्या लग्नाची चिंता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशा विविध कारणांमुळे कर्जाच्या खाईत बुडालेल्या मराठवाडा, विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, शाळाबाह्य, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या पंखांना बळ मिळावे, यासाठी डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूलने २०१२ पासून सर्व शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. सध्या संस्थेत २१० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण, निवास, जेवण, सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची मोफत व्यवस्था संस्थेने केली आहे. यासोबतच बारावीनंतर तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, हॉटेल व्यवस्थापन, एमबीए, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठीदेखील इतर संस्थेत मोफत प्रवेश देण्यासाठी संस्थेकडून सर्वतोपरी मदत केली जाते. त्यांचे शुल्क भरले जाते. यामध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. तसेच पैठण तालुक्यातील चोंढाळा येथे संस्थेतर्फे शाळा सुरू करण्यात आली असून येथेही विद्यार्थ्यांना असा आधार दिला जातो.

हेही वाचा: 'भगवान रामचा वापर केवळ राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी'

येथे साधा संपर्क

श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूल, सम्राटनगर सातारा परिसर, मोबाईल क्रमांक श्‍यामसुंदर कनके- ९४२३३९२५६५

आमच्या संस्थेत अगोदर आत्महत्यग्रस्त शेतकरी कुटुंब, शाळाबाह्य, ऊसतोड कामगारांची मुले-मुली शिक्षण घेत आहेत. आता जी मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत, अशांनी प्रवेशासाठी आमच्याशी संपर्क करावा. कागदपत्रांची कोणतीही अडचण आमच्या संस्थेत नाही. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या राज्यभरातील मुले-मुलींनी प्रवेशासाठी आमच्याकडे संपर्क करावा.

- श्‍यामसुंदर कनके, संस्थाध्यक्ष

loading image