esakal | औरंगाबादेतील पर्यटनस्थळे उद्यापासून होणार सुरु,'हे'आहेत नवीन नियम
sakal

बोलून बातमी शोधा

बीबी का मकबरा

उद्या गुरुवारपासून (ता.१७) पर्यटनस्थळे सुरु होत आहेत. मात्र धार्मिकस्थळे बंदच राहतील.

औरंगाबादेतील पर्यटनस्थळे उद्यापासून होणार सुरु,'हे'आहेत नवीन नियम

sakal_logo
By
मधुकर कांबळे, गणेश पिटेकर

औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत व्यवसायांवरील निर्बंध हटविण्यात आले आहे. आता या अनलाॅकचा पुढचा भाग म्हणजे औरंगाबादसह Aurangabad जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी Tourist Places In Aurangabad खुली करण्यात येत आहेत, याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण District Collector Sunil Chavan आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता Police Commissioner Nikhil Gupta यांनी संयुक्त आदेश जाहीर केले आहेत. या आदेशानुसार उद्या गुरुवार (ता.१७) सकाळी सहा वाजल्यापासून पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी Tourist सुरु होत आहेत. मात्र धार्मिकस्थळे बंदच राहतील. Tourist Places Of Aurangabad Open From Tomorrow

कोणती पर्यटन स्थळे?

- बीबी का मकबरा Bibi Ka Maqbara

- औरंगाबाद लेणी Aurangabad Caves

- वेरुळ लेणी Ellora Caves

- अजिंठा लेणी Agantha Caves

- दौलताबाद किल्ला Daultabad Fort

हेही वाचा: शेतीची ओढ बसू देत नव्हती, मग नोकरी सोडून गाठले गाव

पर्यटकसंख्येवर मर्यादा

- सकाळच्या सत्रात एक हजार पर्यटक

- दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटक

हे नियम पाळावे लागतील

- मास्क वापरणे

- शारीरिक अंतर राखणे

- सॅनिटायझर व आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य राहिल.

loading image