esakal | सातबारा उताऱ्याला डिजिटलची जोड देणारे संतोष भोगले पडद्याआड, मुंबईत निधन

बोलून बातमी शोधा

सातबारा उताऱ्याला डिजिटलची जोड देणारे संतोष भोगले पडद्याआड, मुंबईत निधन
सातबारा उताऱ्याला डिजिटलची जोड देणारे संतोष भोगले पडद्याआड, मुंबईत निधन
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : राज्यातील सातबारा उताराला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणारे उपसचिव डॉक्टर संतोष भोगले यांचे शनिवारी (ता.एक) निधन झाले. एका छोट्याशा खेडेगावातून मंत्रालयात उपसचिव म्हणून काम करणारे आणि महाराष्ट्रातील डिजिटल सातबारा तसेच ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन प्रक्रिया यासाठी उत्तम योगदान देणारे डॉक्टर संतोष भोगले यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. उस्मानाबाद (ता. कळंब) जिल्ह्यातील हिंगणगाव संतोष भोगले यांचे मुळगाव. जेमतेम दीड-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातून प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी घेतले. त्यानंतर एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होत मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम पाहिलं.

हेही वाचा: निसर्गातील फेरभरणच होतेय कमी! वाढली कृत्रिम ऑक्सिजनची गरज

मात्र प्रथमपासूनच डॉक्टर भोगले यांना तंत्रज्ञानाची आवड होती. शिवाय ग्रामीण भागाची पूर्ण जाण असल्याने आणि शेती हा आवडीचा विषय असल्याने त्यांनी डिजिटल सातबारा या मोहिमेमध्ये स्वतःला झोकून दिलं. डिजिटल सातबारा आणि पेपरलेस वर्क किती महत्त्वाचा आहे, त्यांनी जाणले होते. शिवाय संग्राम प्रणाली अंमलात आणण्याचे मध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला. हस्ताक्षरातील गोंधळ आणि त्यात होणारी हेराफेरी यामुळे डिजिटल सातबारा ही सामान्य शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी राज्यात डिजिटल सातबारा प्रणाली राबविण्यात मोलाचे योगदान दिले. ग्रामपंचायतीचा कारभारही ऑनलाईन पद्धतीने झाला पाहिजे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अनेक ग्रामपंचायतीत संग्राम प्रणाली राबविण्यासाठी त्यांनी काम केले. मागच्या रविवारी म्हणजे २५ एप्रिल रोजी ते आपल्या मूळगावी आले होते. विविध उपक्रमाबाबत त्यांनी यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चाही केली होती. मात्र मुंबईत गेल्यानंतर त्यांना थोडा त्रास जाणवला आणि शनिवारी तारीख एक त्यांचे निधन झालं. त्यांच्या निधनाने तंत्रज्ञानप्रेमी असलेला एक उमदा अधिकारी गमावल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.