esakal | निसर्गातील फेरभरणच होतेय कमी! वाढली कृत्रिम ऑक्सिजनची गरज

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed
निसर्गातील फेरभरणच होतेय कमी! वाढली कृत्रिम ऑक्सिजनची गरज
sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून ऑक्सिजन देतात हे शालेय जीवनापासून माहीत असूनदेखील जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी झाडे कमी होत आहेत. त्याचा परिणाम वातावरणातच ऑक्सिजन कमी होत आहे. कोरोनाच्या फुप्फुसावरील हल्ल्याबरोबरच विद्यमान परिस्थितीत कृत्रीम ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासण्याला हेदेखील कारण असल्याचे मत पर्यावरणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केले. पूर्वी आपल्याकडे वड, पिंपळ, आंबा, कडुनिंब अशी मोठाली झाडे लावली जायची. रस्त्याच्या कडेने अशी मोठाली झाडे दिसायची. वाटसरूंना सावली देण्याबरोबरच धूलिकण, वायुकण शोषून घेऊन ऑक्सिजन देण्याचे काम झाडे करतात हेदेखील रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यामागचे शास्त्रीय कारण आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

कोरोना महामारीमुळे ऑक्सिजन हा सतत कानावर पडणारा शब्द आहे. कोरोनाचा विषाणू बाधितांच्या थेट फुप्फुसावर आक्रमण करून त्याला कमकुवत बनवतो. त्यामुळे श्‍वसनाला त्रास होतो. पर्यायाने ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासायला लागते. यापूर्वीही अस्थमाचे रूग्ण होते, धूम्रपानामुळे फुफ्फुस कमकुवत होत होते. त्यावेळीही ऑक्सिजनची गरज पडत होती. मात्र त्या तुलनेत कोरोना महामारीमुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढत आहे.

हेही वाचा: वीज कोसळून लागली आग; शेतकरी बचावला, लाखोंचे नुकसान

झाडे लावणे अन् जगविण्याची गरज

याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे डॉ. बलभीम चव्हाण म्हणाले, की मोठी झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करून आपणाला देत असतात. मात्र, लवकर वाढणाऱ्या आणि परदेशी झाडांवरचे आपले प्रेम वाढल्यामुळे अशी मोठी झाडे कमी झाली आहेत. परिणामी वातावरणातीलही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. साहजिकच निसर्गतील ऑक्सिजनचे फेरभरण कमी होत आहे. परिणामी सर्वसाधारणपणे लोकांना प्रती व्यक्ती मिळणारी ऑक्सिजनची मात्रा कमी कमी होत गेली. यामुळे शरीरावर ताण पडत असतो. ताण पडलेल्या शरीराला आजारामुळे आणखी ऑक्सिजनची गरज पडली तर त्याची पूर्तता होत नाही मग अशावेळी त्या शरीराला बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक

चार टक्क्यांनी तरी होणार लाभ

सुदृढ शरीर पुरेसा ऑक्सिजन वातावरणातून घेते. ऑक्सिजन घेण्याइतपत काहींचा सुदृढपणाही कमी होत आहे. मुळात ऑक्सिजन कमी आहे आणि त्याची गरज वाढली आहे मात्र त्याची उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात राहिली, लागवड करून ती जगवली तर किमान २ ते ४ टक्के लोकांना तरी बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज पडणार नाही असा डॉ. चव्हाण यांनी दावा केला.