esakal | कोविड रुग्णालयात नातेवाईकांची गर्दीच, 'सुपर स्प्रेडर'चा धोका कायम

बोलून बातमी शोधा

कोविड

कोविड रुग्णालयात नातेवाईकांची गर्दीच, 'सुपर स्प्रेडर'चा धोका कायम

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयामधील नातेवाईकाची गर्दी अजुनही कमी झालेली नाही. मंगळवारी रात्री अचानक नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील निम्मे नातेवाईक पॉझिटिव्ह सापडले होते. एक दिवसानंतर पुन्हा तशीच परिस्थिती दिसुन येत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी आहे. तशीच दिसुन येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांमुळे धोका अधिक असल्याचे जाहीर सांगुन सुद्धा त्यात कोणताही बदल होत नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

एका बाजुला सगळीकडे बंदसदृश्य परिस्थिती आहे. बाहेर फिरणाऱ्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्याची गरज आहेच. पण दुसऱ्या बाजुला जिथे अधिक धोका आहे. त्या गोष्टीकडे पोलिस व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णावर उपचार करण्याचे काम रुग्णालयात सूरु आहे. तिथे त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नातेवाईकांपासुन घरी सुरक्षित असलेल्या लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे.

हेही वाचा: पुरुषांपेक्षा महिला सुरक्षित, कोरोनाबाधितांमध्ये संख्या निम्म्याने कमी

मंगळवारी रात्री अचानक केलेल्या तपासणीमध्ये नातेवाईका मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे दिसुन आले होते. असे असताना तरी प्रशासनाकडुन ठोस उपाययोजना केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती दिसत आहे. ज्या रुग्णांला मदतीसाठी नातेवाईकांची आवश्यकता आहे. त्यांचा अपवाद वगळता इतर सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी थांबण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे त्या ठिकाणी रुग्णांना सकाळी नाष्टा दुपारी जेवण व रात्री जेवण अशी अत्यंत चांगली सोय केलेली आहे. तरीही घरातुन डबे घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा डबे घेऊन येणाऱ्या नातेवाईकांकडुन किती जणाना संसर्ग होत असेल याचा काहीच नेम नाही. अशावेळी नातेवाईकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

त्यातही घरात वृद्ध मंडळी असतील तर त्यांना याची लागन अधिक लवकर होते. त्याच वयातील लोकांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मात्र नातेवाईकांमध्ये याचा कसलाही विचार केल्याचे दिसत नाही. अगदी पहिल्या दिवसापासुन हे चित्र असल्याने रुग्णांच्या घरातील लोकांची संख्या पॉझिटिव्ह येण्यामध्ये अधिक दिसत आहे. जिथे रुग्ण पॉझिटिव्ह आला. त्याचवेळी त्याच्या घरातील नातेवाईकानाही काही दिवसामध्ये संसर्ग झाल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का असा सवाल उपस्थित होत आहे.