esakal | कोरोना लसीच्या प्रतिक्षेत १८ हजार नागरिक, लसीकरणासाठी भटकंती

बोलून बातमी शोधा

कोरोना लसीच्या प्रतिक्षेत १८ हजार नागरिक, लसीकरणासाठी भटकंती
कोरोना लसीच्या प्रतिक्षेत १८ हजार नागरिक, लसीकरणासाठी भटकंती
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सुमारे १८ हजार नागरिक सध्या कोव्हॅक्सिन लसीच्या (Covaxin Vaccine) प्रतिक्षेत आहेत. कुठे डोस मिळतो का? अशी विचारणा करीत अनेक नागरिक फिरत आहेत. दरम्यान याबाबत २० हजार डोसची मागणी केली असून पुढील आठवड्यात कोव्हॅक्सिन लसीचा सुरळीत पुरवठा होईल, असा विश्वास पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड (Covishield Vaccine) अशा दोन प्रकारची लस नागरिकांना देण्यात आली आहे. यामध्ये कोविशील्ड लसीचा मोठा वाटा आहे. (Osmanabad Today News 18 Thousand Corona Vaccine Dose Awaits) दरम्यान कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

हेही वाचा: पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २३ हजार ११६ नागरिकांनी आतापर्यंत कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये शासकीय दवाखान्यात २१ हजार ६८७ तर खासगी दवाखान्यात एक हजार ४२९ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. या सर्वच नागरिकांना २९ दिवसानंतर दुसरा डोस देण्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत शासकीय रुग्णालयात दोन हजार ९७८, तर खासगी रुग्णालयात ३०० नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. मात्र उर्वरित सर्वांना दुसऱ्या डोसची प्रतिक्षा लागली आहे.

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

दुसरा डोस मिळण्याच्या प्रतिक्षेत

कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या बहुतांश नागरिकांची दुसरा डोस घेण्याची वेळ संपली आहे. २३ हजार ११६ पैकी सुमारे ८० ते ९० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या जिल्हा स्तरावर कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दुसरा डोस कुठे मिळतो का? याची माहिती घेत नागरिक विविध रुग्णालयात, शासकीय दवाखान्यातून घेत आहेत. मात्र कोव्हॅक्सिन डोसबाबात नागरिकांना कोणताही संदेश देता येत नाही. आल्यानंतर सांगितले जाईल, असे सांगितले जात आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झाल्यानंतर ते सर्वच डोस जुन्याच नागरिकांना दुसरा डोस म्हणून दिले जाणार आहेत. त्यामुळे लस आल्यानंतर सर्वांना देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: नैसर्गिक ऑक्सिजनसाठी हवीत घरासमोर तुळशी अन् परिसरात पिंपळ, वड

कोव्हॅक्सिनच्या लस पुरवठ्याबाबात संबंधीत यंत्रणेशी बोलणे झाले आहे. २० हजार कोव्हॅक्सिन लसीची मागणी जिल्ह्यातून केलेली आहे. मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून पुढील आठवड्यात आपल्या जिल्ह्यात कोव्हॅक्सीन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. नागरिकांनी घाई करू नये. सर्वांना दुसरा डोस मिळेल.

- शंकरराव गडाख, पालकमंत्री.