वैजापूर : शहराजवळील लाडगाव चौफुलीवरील शिव कल्पवृक्षनगर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सातदिवसीय शिवमहापुराण कथेला गुरुवारी (ता. २६) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी दोन लाखांहून अधिक शिवभक्तांनी उपस्थिती लावली. .कथा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच भाविकांनी मंडपात मुक्कामी होते. श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे..यंदा युवा उद्योजक विशाल जीवनलाल संचेती यांच्या पुढाकाराने पारायणासोबत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या प्रारंभी आयोजक जीवन-सुनीता संचेती, विशाल-तृप्ती संचेती, सौरभ-साक्षी संचेती यांनी ग्रंथपूजन केले. .Chh. Sambhaji Nagar News : १० वर्षांपासून शिक्षणासाठी निस्वार्थ सेवा; अजिंक्य डोईफोडेचा प्रेरणादायी उपक्रम.यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, आमदार प्रा. रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, शेख अकिल, साबेर खान उपस्थित होते. दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी शहरातील सर्व मंगल कार्यालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत..महादेवावर विश्वास ठेवासमुद्रमंथनातून निघालेले हलाहल जेव्हा महादेवाने पचवले, तेव्हा ते उतरण्यासाठी औषधोपचारही करण्यात आले. म्हणूनच आजच्या काळात कोणताही आजार झाल्यास वैद्यकीय उपचार करणे आवश्यक असून, त्यासोबत महादेवावर श्रद्धा ठेवून शिव उपासना करावी, असे पंडित मिश्रा यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.