छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीनशे शाळांवर गंडांतर; गरीबांची मुले शिकतील कसे? नागरिकांचा सवाल

200 schools closed in maharashtra
200 schools closed in maharashtra esakal

Chhatrapati Sambhaji Nagar: कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरु आहेत.

त्यामुळे कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा यापुढे गावात दिसणार नाही. मात्र, गावात शाळाच राहिली नाहीतर गोरगरिबांची मुले शिकतील कसे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

200 schools closed in maharashtra
जालन्याची मोसंबी जाणार परदेशात! कृषी विभागाच्या पुढाकारामुळे होणार फळांसह भाजीपाल्याची निर्यात

कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यात राहणारी कमतरता हा मुद्दा शालेय शिक्षण विभागाने ऐरणीवर आणला आहे. त्यासाठी राज्यभरात ‘क्लस्टर शाळे’चा प्रयोग राबविला जाणार आहे.

त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे तीनशे शाळांचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे या शाळांमध्ये कार्यरत सहाशे शिक्षकांच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

शासन त्या सहाशे शिक्षकांना कुठेतरी समायोजन करील, परंतू या तीनशे गावात यापुढे जिल्हा परिषदेची शाळाच नसणार आहे. त्यामळे त्या गावांतील गोरगरीब मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

200 schools closed in maharashtra
Nana Patole News : 'अतिशय कमी बुद्धी असलेला प्रदेशाध्यक्ष'; शहाजी बापू पटोलेंवर बरसले!

क्लस्टर अंतर्गत लहान मुलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर शेजारच्या गावातील शाळेत पाठवावे लागणार आहे. त्यामुलांना ने-आण करण्याची सुविधा शासन करणार असले तरी, वाडीवस्तीवर राहाणाऱ्या मुलांना घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी एखादी व्यक्ती गुंतवणार आहे. (Latest Marathi News)

परिणामी, शेतातील कामे खोळंबतील. मजुरी करणाऱ्या पालकांना मुलासाठी घरी थांबणे परवडण्यासारखे नाही, असे मजुरी करणाऱ्या पालकांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनणार

-कमी पटसंख्येच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडल्यास जिल्ह्यातील तब्बल तीनशे जिल्हा परिषद शाळांवर गंडांतर येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या खेड्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com