Asaduddin Owaisi
sakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीत एमआयएमचे १२५ नगरसेवक विविध ठिकाणी निवडून आले. एमआयएमच्या चिन्हावर निवडून आलेले सर्व नगरसेवक पक्षासोबतच राहतील. एकही नगरसेवक बाहेर पडणार नाही, यासाठी पक्षाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. नगरसेवकांनी मला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय परस्पर घेऊ नये,असेही त्यांनी स्पष्ट केले.