

Encroachment
sakal
पैठणगेट : शहरातील सर्वाधिक गजबलेल्या पैठणगेट परिसरात ३५ वर्षांपासून अनधिकृतरीत्या थाटलेल्या दुकानांवर महापालिकेच्या पथकाने बुधवारी (ता. १९) सकाळपासून बुलडोझर फिरविणे सुरू केले. दिवसभरात सुमारे ११८ पेक्षा अधिक मालमत्तांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यासाठी महापालिकेचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे दिवसभर ठाण मांडून होते. ही कारवाई सुरू असताना फारसा कुणी विरोध केला नाही.