Paithan : कार्यकर्त्यांना आखाडानिमित्त सुगीचे दिवस; निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना पार्टीसाठी गळ

निवडणूक होईल, तेव्हा होईल पण यंदाचा आखाड जोरात झाला पाहिजे,
mutton curry Paithan
mutton curry Paithanesakal

पैठण - गेल्या काही महिन्यांपासून काहीशा अडगळीत पडलेल्या पैठण शहर व तालुक्यातील कार्यकर्त्याला आखाडाच्या निमित्ताने पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. निवडणूक होईल, तेव्हा होईल पण यंदाचा आखाड जोरात झाला पाहिजे, असे म्हणून अनेक कार्यकर्ते इच्छुकांना आखाड पार्टीची मागणी करीत आहे. रविवारी (ता.१६) हा आखाड पार्टीचा शेवटचा दिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पार्ट्यांची धमाल पाहायला मिळणार आहे. दरम्यान, इच्छुकांनीही आखाडामुळे हात आखडता न घेता सैल सोडल्याचे चित्र आहे.

mutton curry Paithan
Mumbai News : थेट रेल्वे इंजिन वाहतुकीत अपहाराचा प्रयत्न! वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आखाड पार्ट्यांमुळे परिसरातील मंगल कार्यालय, हॉटेल व शेती फार्म हाऊस मध्ये जेवणावळींना बहर आला आहे. मात्र, एका निरोपामागे चारजण येऊन संख्या वाढत असल्याने नियोजन बिघडत असल्याच्या गंमती जमतीही घडत आहेत.

त्यातूनच हॅलो, नेते मटण कमी पडलंय, पंगत बसलीय बिर्याणी मागवा असेही निरोप दिले जात आहेत. केटरर्स, हॉटेल व्यावसायिक, चिकन मटण दुकानदारांना किलोच्या दरावर शंभर शंभर किलोच्या ऑर्डर मिळत आहेत.

mutton curry Paithan
Mumbai : भाईंदर येथे विषबाधेमुळे आई व मुलाचा मृत्यू

आखाड पार्टीसोबत मद्यही द्यावे लागत असल्याने इच्छुकांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. नुसतं कोरडं नको, ओलंही पाहिजे, असा सूर निघत असल्याने जेवणावळीसाठी मटणासह मद्याची व्यवस्थाही इच्छुकांना करावी लागत आहे.

प्रत्यक्ष आखाड पार्टीत तुम्हीच निवडून येणार, त्यासाठी आम्ही जिवाचं रान करणार, असं आश्वासन देऊन कार्यकर्ते इच्छुकांना हरभऱ्याच्या झाडावर बसवत आहेत. दरम्यान, मागील चार महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. यावेळी इच्छुकांनी खर्च करण्यास सुरुवात केली होती. परंतु पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्याने खर्चाला कात्री लावली. परंतु आखाडा पुरता खर्च सुरु केला आहे.

mutton curry Paithan
Mumbai : भाईंदर येथे विषबाधेमुळे आई व मुलाचा मृत्यू

हॉटेल व्यावसायिकांची चांदी

गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांनी खर्चावर बंधने आणली होती. निवडणुका निश्चित झाल्याशिवाय खर्च नको रे बाबा ही भूमिका त्यांनी घेतली होती.

मात्र, पुन्हा आखाडाच्या निमित्ताने खर्च करण्याची तयारी केली आहे. रविवार हा दिवस शेवटचा असल्याने कार्यकर्ते व हितचिंतकाचे फोन खणखणू लागले आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच हॉटेल व्यावसायिक, ढाबा चालक, केटरर्स यांची चांदी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com