esakal | Video: पंकजाताईंच्या इंदुरातील कृतीने कार्यकर्त्यांना झाली गोपीनाथ मुंडेंची आठवण 
sakal

बोलून बातमी शोधा

Pankja Munde News

काही दिवसांपूर्वी त्या मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पक्षाच्या कामानिमित्त गेल्या होत्या.

Video: पंकजाताईंच्या इंदुरातील कृतीने कार्यकर्त्यांना झाली गोपीनाथ मुंडेंची आठवण 

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात. काही दिवसांपूर्वी त्या मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पक्षाच्या कामानिमित्त गेल्या होत्या. येथे कार्यकर्त्यांसोबत इंदूरचे प्रसिद्ध पोहे खोतानाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. यात त्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून एकाने गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली असून तेही असेच जनतेत मिसळायचे असे म्हटले आहे. येथील भाजप प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंडे यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष मुरलीधर राव, सहअध्यक्ष विश्वेश्वरय्या यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी इंदूर विमानतळावर पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले होते.


अखेर मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांनी परळी वैजनाथ (जि.बीड) तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण ता.२७ जानेवारी मागे घेतले होते. तालुक्यातील हिवरा ते पारगाव या गट क्रमांक १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. पंकजा मुंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अतिक्रमण करणाऱ्याविरुध्द तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते.

Edited - Ganesh Pitekar


 

loading image