esakal | लोकसहभागातून रुग्णाला मदत, विनाखर्च रुग्णवाहिकेतून पाठविले घरी
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

घाटी रुग्णालयातून सुटी झाली; पण जायचे कसे असा प्रश्‍न कुटुंबातील वयोवृद्ध रुग्णासमोर होता. त्यांची आर्थिक स्थितीही बिकट असल्याने व रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नव्हता. या बाबीची जाणीव ठेवत लोकांच्या लाखमोलाच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्यांना घरी पोचवता आले.

लोकसहभागातून रुग्णाला मदत, विनाखर्च रुग्णवाहिकेतून पाठविले घरी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून सुटी झाली; पण जायचे कसे असा प्रश्‍न कुटुंबातील वयोवृद्ध रुग्णासमोर होता. त्यांची आर्थिक स्थितीही बिकट असल्याने व रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नव्हता. या बाबीची जाणीव ठेवत लोकांच्या लाखमोलाच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्यांना घरी पोचवता आले. रुग्णाला यादरम्यान कसलाही खर्च न लागला नाही.

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, ऑनलाइन परीक्षा होणार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान


घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १४ आर्थोपेडिक विभागांतर्गत युनिट-३ मध्ये धोंडिराम गायकवाड भरती होते. त्यांना रुग्णालयातून आज (ता. २०) सुटी झाली. त्यांच्या निलजगाव (ता. पैठण) येथे घरी सोडण्यासाठी रोशनजी पिपाडा यांनी रुग्णवाहिकेला लागणारा इंधन खर्च बाराशे रुपयांची मदत देऊ केली; तसेच चाचू ग्रुपच्या रुग्णवाहिकेने या रुग्णाला २१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांची उपस्थिती होती. या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले आहे अशी माहिती समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी दिली.

यांच्या पुढाकारने मिळतेय मदत
आर्थोपेडिक विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, पथक प्रमुख डॉ.नीलेश कचनेरकर, सहायक प्राध्यापक डॉ.अल्ताफ पठाण, डॉ.अब्दुल्ला तसेच त्यांची टीम सर्व रेसिडेंट डॉक्टर गौरव मते, अभिनव बोरकर, शुभम ढाकणे, अमान तनुरक, प्रशांत बनसोडे, करण बरिया यांनी या रुग्णाच्या कमरेचे फॅक्चर झालेले हाड दुरुस्त केले आहे. समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी रुग्णाचे पुनर्वसनाचे, मदतीचे व घरी पाठवण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले.
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top