

Patients and the Needy Mourn as Social Worker Rajkumar Khinvasara Passes Away
Sakal
छत्रपती संभाजीनगर: आजवर अक्षरशः लाखो भुकेल्यांच्या पोटाला अन्न देणारे, रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे ज्येष्ठ समाजसेवक राजकुमार भोजराज खिंवसरा (काका) यांचे सोमवारी (ता. १९) निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शहराने रुग्णांचा, गरजूंचा आणि भुकेल्यांचा खरा आधारवड गमावला.