esakal | पाण्यासाठी नागरिक प्रशासक पांडेय यांच्या बंगल्यावर, रात्री ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

1astik_20kumar_20pandey

नागरिकांनी ठिय्या दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटीचौक पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या पाच ते सहा नागरिकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

पाण्यासाठी नागरिक प्रशासक पांडेय यांच्या बंगल्यावर, रात्री ठिय्या

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : दहा दिवसानंतरही नळाला पाणी आले नसल्याने वानखेडेनगर वॉर्डातील मुजफ्फरनगर भागातील नागरिक सोमवारी (ता. २५) रात्री थेट महापालिका आयुक्त तथा प्रशासक (Aurangabad Municipal Corporation) आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांच्या बंगल्यावर धडकले. पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांना सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक भागात सहा-सात दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मुजफ्फरनगर भागात नळाला आठ ते दहा दिवसापासून पाणी आले नसल्याचा आरोप करत सोमवारी रात्री नागरिक दिल्लीगेट येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर जमा झाले. (People Marched On Municipal Corporation Chief Bungalow For Water)

हेही वाचा: 'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'

नागरिकांनी ठिय्या दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटीचौक पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या पाच ते सहा नागरिकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान नागरिकांनी सांगितले की, पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाणी विकत घेण्यासाठी काम धंदे बंद असल्याने पैसे नाहीत. महापालिकेकडे तक्रार केली तर आधी पाणीपट्टी भरायला सांगितले जाते. तक्रार तरी कोणाकडे करावी? खासदारांकडे तक्रार केली असता, त्यांनी महापालिकेकडे जायला सांगितले. पण आयुक्त भेटले नाहीत, असे आमेर चाऊस यांनी सांगितले. मुजफ्फरनगर भागाला एक तास पाणी देण्यात येते. पण कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.