भुमरेंचा सत्तेसाठी आटापिटा,मात्र मतदारसंघातील जनता पाणीटंचाईने हैराण

माजी मंत्री संदिपान भुमरे सत्तेच्या खेळात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघातील ढोरकीनसह इतर भागातील तीव्र पाणीटंचाई दिसेना.
Water Scarcity In Sandipan Bhumare's Paithan Constituency In Aurangabad
Water Scarcity In Sandipan Bhumare's Paithan Constituency In Aurangabad esakal

ढोरकीन (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद जिल्ह्यातील ढोरकीन येथे मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. लहान मुलांसह वयोवृद्ध मिळेल तेथून पाणी आणतांना दिसत आहेत. गावामध्ये जवळपास पाण्याचे स्रोत नसल्याने येथील नागरिकांची भिस्त ही औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या गळतीवरच अवलंबून असते. सध्या येथील ग्रामपंचायतीमार्फत होणारा पाणीपुरवठा हा दहा ते बारा दिवसांनी होतो. ते ही कुठली ही प्रक्रिया न होता. विशेष म्हणजे शिंदे गटातील बंडखोर आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारासंघातील हा भाग आहे. मात्र भुमरे सत्ता कारणात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या पैठण मतदारसंघातील पाणीटंचाई दिसेनाशी झाली आहे.

Water Scarcity In Sandipan Bhumare's Paithan Constituency In Aurangabad
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय?

त्यातच ढोरकीन जवळ वसलेल्या जोगेश्वरी वसाहत ही जायकवाडी प्रकल्प बाधितांची असल्याने तिला शासनाकडून मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाची असतांना देखील या वसाहतीला दहा ते बारा दिवसांनी पाणी येते. ढोरकीन येथून काही अंतरावर भव्य नाथसागर असताना येथील नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. दहा दिवसांपूर्वी या पुनर्वसित वसाहतीत नळाला पाणी आले. ते काहींच्या नळाला आले तर काहींच्या नळाला पाणीच आले नाही. ज्यांच्या नळाला पाणी येत नाही असे नागरिक गरिबी असल्याने त्यांची कुणी दखल ही घेत नाही. (Water Scarcity In Aurangabad)

Water Scarcity In Sandipan Bhumare's Paithan Constituency In Aurangabad
औरंगाबाद : मिरचीचे पीक सापडले संकटात

त्या दिवशी काही महिला आमच्या नळाला पाणी का येत नाही म्हणून विचारणा करण्यासाठी येथील जलकुंभावर गेल्या असता तेथे कार्यरत असलेले कर्मचारी म्हणाले तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जा, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे जो दहा-बारा दिवसांनी पाणी होतो. त्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला पाणी केव्हा येईल असे विचारले असता तो येईल संध्याकाळी परंतु संध्याकाळी काही पाणी येत नाही. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता औरंगाबाद (Aurangabad) मनपाने पाणीपुरवठा कमी केल्यामुळे असे होत आहे. असे सांगितले जाते. या पाणीटंचाईमुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले आहे. तरी गटविकास अधिकारी पैठण यांनी याकडे लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com