
उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत.
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय?
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत. 30 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. शिंदेंच्या आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या पदावर होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडं किती पैसे आहेत किंवा त्यांची मालमत्ता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊ..
हेही वाचा: BSF जवानाच्या गोळीबारात 4 जवान शहीद; कोर्टाकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
उद्धव ठाकरे 143 कोटी 26 लाखांचे मालक
उद्धव ठाकरे 2020 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) माध्यमातून आमदार झाले. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडं 143 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता आहे. उद्धव यांच्यावर 15 कोटी 50 हजार रुपयांचं दायित्वही आहे. उद्धव हे दोन बंगल्यांचे मालकही आहेत. या शिवाय, ठाकरेंकडं 76.59 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी 52.44 कोटी रुपये स्थावर आणि 24.14 कोटी रुपये जंगम आहे, असं विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडं 65.09 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यापैकी 28.92 कोटी रुपये स्थावर आणि 36.16 कोटींची मालमत्ता आहे.
हेही वाचा: योगी राज 2.0 : 500 एन्काउंटर, 192 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या 100 दिवसांचा कार्यकाळ
एकनाथ शिंदे आहेत 'एवढ्या' कोटींचे मालक
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, शिंदे यांच्याकडं 11,56,12,466 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात 32,64,760 रुपये रोख होते. शिंदे दाम्पत्यानं जीवन विम्यात 50,08,930 रुपयांची गुंतवणूक केल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलंय. शिंदे दाम्पत्याकडं आरमाडा, स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा या सर्व कंपन्यांची 7 वाहने आहेत. शिंदे यांच्याकडं रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूलही असून, या दोन्हींची किंमत 4.75 लाख रुपये आहे. शिंदे दाम्पत्याकडं 9,45,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच शिंदेंकडं 4,47,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडं 4,98,00,000 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
Web Title: Do You Know The Property Of Eknath Shinde Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..