

MP Dr. Kalyan Kale Issues Privilege Notice to CEO Over MGNREGA Scam
Sakal
फुलंब्री : तालुक्यात मनरेगा योजनेंतर्गत ‘मातोश्री पाणंद रस्ते’ कामांमध्ये तब्बल ५ कोटी १८ लाख रुपयांच्या अनियमितता झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असूनही, दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचा गंभीर आरोप करत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हक्कभंगाची नोटीस दिली आहे. रोहयोतील घोटाळा व अनियमित प्रकरण जुलै २०२५ मध्ये उघड केले होते. एकाच मजुरांच्या ग्रुप फोटोचा वारंवार वापर करून बनावट मजुरी बिले काढल्याचे चौकशी समितीनेही निष्पन्न केले आहे.