Phulambri Police
esakal
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री पोलिस ठाण्यातील (Phulambri Police) गुन्ह्यात अटक केलेला आरोपी हातकडीसह पोलिसाला गुंगारा देऊन पसार झाला. दरम्यान, वाहतूक पोलिसांना रिक्षाविरोधी सुरू असलेल्या कारवाईत हा आरोपी पोलिसांच्या अलगद हाती लागला. कारभारी श्यामलाल घुशिंगे (वय ४१, रा. निधोना, ता. फुलंब्री) असे त्याचे नाव आहे.