
Road Damage
sakal
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील गेवराई पायगा ते बोरगाव अर्ज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व पाणी साचल्याने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुरुस्तीची कोणतीही हालचाल न झाल्याने गेवराई पायग्याचे सरपंच मंगेश साबळे यांनी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरील चिखलात लोळून रविवारी (ता.१४) अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.