

Phulambri Medical Waste
esakal
फुलंब्री: शहरातील शिवमनगरी परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या बाटल्या, व्हायल्स तसेच वैद्यकीय साहित्याचे बॉक्स रस्त्यालगत पडलेले आहेत. काही बॉक्स उलटल्याने कचरा थेट रस्त्यावर विखुरला आहे.