esakal | महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabeej

कधी हवामान बदल, तर कधी पावसाचा खंड यासारख्या संकटामुळे मागील दोन तीन वर्षात परंपरेने घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांची शेतकऱ्यांना शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता तूर उत्पादनाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपासाठी परभणी कृषी विद्यापीठाने ६१ क्विंटल बियाणे उपलब्ध केले होते. ते संपल्यानंतर महाबीजने मंगळवारी ६४ क्विंटल बियाणे उपलब्ध केले.

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: कधी हवामान बदल, तर कधी पावसाचा खंड यासारख्या संकटामुळे मागील दोन तीन वर्षात परंपरेने घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांची शेतकऱ्यांना शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता तूर उत्पादनाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपासाठी परभणी कृषी विद्यापीठाने ६१ क्विंटल बियाणे उपलब्ध केले होते.

ते संपल्यानंतर महाबीजने मंगळवारी ६४ क्विंटल बियाणे उपलब्ध केले. मागील दोन दिवसापूर्वी विद्यापीठांतर्गत असलेल्या बियाणे विक्री केंद्रावरील बियाणे संपले होते, लगोलग महाबीजने बियाणे उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

कोरडवाहू क्षेत्रावरही चांगले उत्पादन देणाऱ्या तूरीच्या बीडीएन ७११ या वाणाला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगलीच पसंती देत यंदाच्या खरिपात खरेदी केले आहे. हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कोरडवाहूसाठी खास संशोधित केलेले आहे. मात्र पाच जून रोजी औरंगाबादेतील केंद्रातील या वाणाचे बियाणे संपल्याने शेतकऱ्यांची बियाण्यासाठी मागणी सुरुच होती. 

लाल रंग धोक्याचा की पेरणीचा? 
बीडीएन ७११ या वाणाचा रंग पांढरा आहे, परंतू महाबीजने उपलब्ध करुन दिलेल्या बियाण्याच्या पिशवीवर याच वाणाचा लाल रंग आहे. कोरडवाहूसाठी असलेले वाण म्हणून शेतकरी पसंत करतात खरे, मात्र पांढऱ्या रंगाऐवजी लाल रंग असल्याने नेमके वाण बीडीएन ७११ हेच आहे का याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. याविषयी महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क केला असता, हे वाण पिशवीवर लाल रंग असला तरी बीडीएन ७११ हेच वाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा-  मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन....

महाबीजतर्फे देण्यात येणाऱ्या तुरीच्या सर्वच वाणाच्या बियाण्याच्या पिशवीवर लाल रंग आहे, वेगवेगळ्या वाणांसाठी वेगवेगळ्या पिशव्या तयार केल्या जात नाहीत, एकाच पिशवीत लाल, आणि पाढरा रंगाचे तुरीचे बियाणे दिले जात आहे. नुकतेच ६४ क्विंटल दिले असून दोन दिवसात १२० क्विंटल देण्याचा प्रयत्न आहे. 
-शिरीष काळे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज. 

तूरीच्या वाणाच्या रंगाऐवजी संबंधितांशी बोलणार आहे. पिशवीवर जरी तुरीच्या लाल रंगाचा दाण्याचा फोटो असला तरी पिशवीत बीडीएन ७११ हे पांढरे वाण आहे. 
-आनंद गंजेवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी. 

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार 

loading image
go to top