Sambhaji Nagar : रस्त्यावरील पाइप ठरताहेत नागरिकांसाठी डोकेदुखी

शहराच्या विविध भागांत कंपनीने केला साठा, रस्ते अरूंद झाल्याने वाहतुकीला अडथळा
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी २,७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीने शहराच्या विविध भागात मोठमोठे पाइप आणून ठेवले. काही पाइप खुल्या जागांमध्ये तर काही पाइप अनेक महिन्यांपासून रस्त्यावर पडून आहेत. जळगाव सर्व्हिस रोडवर पडून असलेल्या पाइपमुळे नागरिक त्रस्त आहेत. हा रस्ता अरुंद असून, हे पाइप अपघाताला आमंत्रण ठरत आहेत.

नव्या पाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिले आहे. पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी न्यायालयात वारंवार सुनावणी होत आहे. त्यात कंपनीने डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे. योजनेत शहरांतर्गत सुमारे १९०० किलोमीटर अंतराचे विविध व्यासाचे पाइप टाकले जाणार आहेत. जलकुंभापर्यंत जाणारे पाइप हे दोन हजार ते पाचशे मिलिमीटर व्यासाचे आहेत.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चला खेळूया’ अभियान सुरू

हे पाइप खरेदी करून कंपनीने शहराच्या विविध भागात रस्त्यावर टाकले आहेत. जळगाव सर्व्हीस रोडवर हे पाइप अनेक दिवसांपासून पडून आहेत. यामुळे सिडको व इतर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुटल्यानंतर या पाईपमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. तसेच काही नागरिक पाइपच्या आडोशाने लघुशंका करतात, तर अनेक चालक आपल्या रिक्षा या पाइपच्या बाजूलाच उभ्या करतात. याचा नागरिकांना त्रास होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com